Dombivli Band Protest : पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक

Dombivli Band Protest : पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक

| Updated on: Apr 24, 2025 | 9:31 AM

Dombivli Shuts Down In Protest : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवलीमध्ये बंद पाळण्यात आला आहे. या हल्ल्यात डोंबिवलीमधील 3 मावस भावांचा मृत्यू झाला आहे.

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी दहशतवादी हल्ला झाला. पुलवामानंतरचा हा सगळ्यात मोठा हल्ला होता. यात अतिरेक्यांनी 26 पर्यटकांचा बळी घेतला. तर अनेक पर्यटक जखमी आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देशासह जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे. जीव गमावणाऱ्या दुर्दैवी पर्यटकांमध्ये 6 पर्यटक हे महाराष्ट्रातले होते. यात 2 पुण्यातले, 3 डोंबिवलीचे आणि 1 नवी मुंबईमधील रहिवासी आहे. याच पार्श्वभूमीवर आज डोंबिवलीकरांनी या हल्ल्याच्या निषेधार्थ बंद पुकारला आहे.

डोंबिवली मधील मृत संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल माने हे तिघे मावस भाऊ होते. त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या तिघांवर काल अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच आमदार देखील उपस्थित होते. तिघांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याने डोंबिवलीकरांमधून संतापाची लाट उसळली आहे. त्याच अनुषंगाने आज कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतंय दिसत आहे,

Published on: Apr 24, 2025 09:30 AM