Pakistan Earthquake : पाकिस्तानला तीव्र भूकंपाचा धक्का, आठवड्यात तिसऱ्यांदा पाक हादरलं

Pakistan Earthquake : पाकिस्तानला तीव्र भूकंपाचा धक्का, आठवड्यात तिसऱ्यांदा पाक हादरलं

| Updated on: May 12, 2025 | 4:27 PM

पाकिस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र पश्चिम पाकिस्तानमध्ये होते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.६ मोजण्यात आली. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने या भूकंपाची माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान, पाकिस्तानला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. यावेळी पाकिस्तान कोणत्याही भारतीय क्षेपणास्त्र किंवा ड्रोनने हादरला नाही तर नैसर्गिक भूकंपाने पाक चांगलंच हादरलं आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आज भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. हा भूकंप दुपारी १ वाजून २६ मिनिटांनी झाला. या भूकंपाची तीव्रता ४.६ आणि खोली १० किलोमीटरपर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे. या आठवड्यात पाकिस्तानमध्ये हा तिसरा भूकंप असल्याची माहिती समोर येत असून पाकिस्तानच्या नागरिकांना चांगलीच धडकी भरली आहे. याआधी ५ मे रोजीही पाकिस्तानात भूकंप झाला होता. त्यावेळी भूकंपाची तीव्रता ४.२ इतकी नोंदवली गेली. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.२ होती.

Published on: May 12, 2025 04:16 PM