UNSC : संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत पाकिस्तानची नाचक्की
India-Pakistan Conflict : संयुक्त राष्ट्राकडून पाकिस्तानला फटकरण्यात आलेलं आहे. त्यामुळे या बैठकीत पाकिस्तानची नाचक्की झाली आहे.
यूएनएससीमध्ये पाकिस्तानचा दावा फोल ठरला आहे. बैठकीनंतर संयुक्त राष्ट्राकडून देखील कोणतंही अधिकृत निवेदन देण्यात आलेलं नाही. यूएनएससीत कोणताही ठरवा मंजूर झालेला नाही. बंद दाराआडच्या बैठकीत देखील पाकिस्तानला नाचक्कीला सामोरं जावं लागलं आहे. आमचं उद्दिष्ट सध्या झाल्याचा कांगावा पाकिस्तानने केला होता. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघात धाव घेणाऱ्या पाकिस्तानची चांगलीच फजिती उडाली आहे. बंद खोलीत बैठक घेण्याची विनंती पाकिस्तानने केल्यानंतर ही बैठक झाली. या बैठकीत अमेरिका, ब्रिटन आणि फ्रांसने पाकिस्तानला चांगलंच धारेवर धरलं. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेवरून या देशांनी पाकिस्तानला फैलावर घेत प्रश्न विचारले. त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली आहे.
Published on: May 06, 2025 07:10 PM
