Pahalgam Terror Attack : पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ‘ही’ रणनिती वापरण्याची भिती

Pahalgam Terror Attack : पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ‘ही’ रणनिती वापरण्याची भिती

| Updated on: Apr 29, 2025 | 6:11 PM

भारत आपली सुटका करणार नाही, अशी भीती पाकिस्तानला वाटू लागली आहे. भारत त्याच्यावर चौफेर हल्ला करेल, अशी भीतीही व्यक्त होत आहे. सोमवारी सरकारने एक ॲडव्हायझरी जारी केली की हॅकर्स सध्याच्या प्रादेशिक अस्थिरतेचा फायदा घेऊन पाकिस्तानवर सायबर हल्ले करू शकतात. 

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये असा कोणताही नेता, विभाग किंवा क्षेत्र उरलं नसेल जो भीती भयभीत नसेल. भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. त्यानंतर दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला चांगलीच आद्दल घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भारताने यापूर्वीच सिंधू करार स्थगित करून पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळवलं आहे. याशिवाय भारताने पाकिस्तानचे इतर अनेक मार्गांनी नुकसान केले आहे ज्यात पाकिस्तानी लोकांना देशातून हाकलून देणे आणि शत्रू देशाचे यूट्यूब चॅनेल बंद करणे असे कठोर पाऊलं भारताने उचलली आहेत. अशातच पाकिस्तान सरकारला भारताकडून सायबर हल्ल्याची भीती वाटतं असल्याची माहिती समोर येत आहे. संरक्षण क्षेत्र, वित्त क्षेत्र आणि माध्यम क्षेत्रावर सायबर हल्ल्याचा धोका आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारकडून यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

 

 

Published on: Apr 29, 2025 06:11 PM