Operation Sindoor : भीतीचं वातावरण, नागरिकांची पळापळ; पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल

Operation Sindoor : भीतीचं वातावरण, नागरिकांची पळापळ; पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल

| Updated on: May 07, 2025 | 6:35 PM

Peshavar Airport : ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानात आता भीतीचं वातावरण आहे. परदेशातून पाकिस्तानात येणारी आणि जाणारी विमानसेवा पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे.

पेशावर विमानतळावर पाकिस्तानी नागरिकांची पळापळ झालेली बघायला मिळाली आहे. पाकिस्तानमधल्या पेशावर विमानतळावर सध्या भीतीचं वातावरण आहे. इस्लामाबाद, लाहोर, पेशावर, कराची येथे परदेशी विमानसेवा थांबवण्यात आलेली आहे. पाकिस्तानच्या मुख्य शहरात येणारी परदेशतली विमानसेवा थांबवली गेली आहे. भारताने मध्यरात्री केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानात आता भीतीचं वातावरण आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारतीय सैन्याने पाकिस्तानात असलेल्या दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांना लक्ष्य करत मिसाईल अटॅक केला आहे. यानंतर आता पाकिस्तानातली विमानसेवा बंद करण्यात आलेली आहे.

Published on: May 07, 2025 06:35 PM