पाकिस्तान्यांना आज भारत सोडावाच लागणार; अटारी सीमेवर काय आहे परिस्थिती?
पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यानंतर आज या नागरिकांना भारत सोडण्याचा शेवटचा दिवस आहे.
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात काही कठोर निर्णय घेतले आहेत. यातच भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ भारत सोडण्याचे निर्देश देण्यात आलेले होते. त्यानंतर आज भारत सोडण्याचा शेवटचा दिवस आहे. पाकिस्तानी नागरिकांना देण्यात आलेला कालावधी आज संपत आहे. त्यामुळे अटारी सीमेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. तर मेडिकल व्हिसा असणाऱ्या पाकिस्तानच्या नागरिकांना 29 एप्रिलपर्यंत भारतात थांबण्याची मुदत देण्यात आलेली आहे.
Published on: Apr 27, 2025 11:04 AM
