पंढरपूर : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिराचा गाभारा सजला

| Updated on: Jan 01, 2022 | 9:46 AM

नव वर्षासाठी सर्वच जण सज्ज झाले असताना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी फळाची व फुलाची आरास करण्यात आली आहे. जरबेरा , गुलाब , शेवंती, गुलछडी, लव्हेंडर, लाल, पिवळ्या , गुलाबी अशा विविध आकर्षक फुलांनी मंदिराचा गाभारा सवजवण्यात आला आहे.

Follow us on

पंढरपूर :  नव वर्षासाठी सर्वच जण सज्ज झाले असताना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी फळाची व फुलाची आरास करण्यात आली आहे. जरबेरा , गुलाब , शेवंती, गुलछडी, लव्हेंडर, लाल, पिवळ्या , गुलाबी अशा विविध आकर्षक फुलांनी तसेच डाळिंब ,अननस , केळी , संत्री , मोसंबी अशा फळांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा गाभारा, सोळखांबी , चार खांबी तसेच सभामंडप आणि मंदिरातील विविध भागांना आकर्षक अशा पध्दतीने सजवण्यात आले आहे. त्यामुळे सावळ्या विठुरायाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे .