Pankaja Munde : मनःशांतीसाठी धनंजय मुंडे विपश्यना केंद्रात… पकंजा मुंडे एका वाक्यात म्हणाल्या…

Pankaja Munde : मनःशांतीसाठी धनंजय मुंडे विपश्यना केंद्रात… पकंजा मुंडे एका वाक्यात म्हणाल्या…

| Updated on: May 30, 2025 | 4:06 PM

गेल्या काही महिन्यांमध्ये चर्चेत राहिलेल्या धनंजय मुंडे यांना आपलं मंत्रिपद गमवावं लागलं. यानंतर अचानक ते आठ दिवस गायब झाल्याचे पाहायला मिळाले. तर ते इगतपुरीतील विपश्यना केंद्रात ध्यानासाठी गेले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे मन:शांतीसाठी इगतपुरीतील विपश्यना केंद्रात आहेत. गेल्या आठ दिवसांपासून धनंजय मुंडे हे ध्यानसाधनेत मग्न झाल्याची माहिती काल समोर आली होती. छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतरच धनंजय मुंडे विपश्यनेसाठी गेल्याची चर्चा होत आहे. मनःशांतीसाठी धनंजय मुंडे इगतपुरी येथील इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात गेल्या ८ दिवसांपासून आहेत. धनंजय मुंडे हे दहा दिवसांच्या कोर्ससाठी इगतपुरीतील विपश्यना केंद्रात गेले असून या संदर्भात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी सवाल केला. यावेळी पंकजा मुंडे यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. ‘चांगलं आहे धनंजय मुंडे यांनी योग्य पर्याय निवडला आहे, आता मनशांती मिळेल’, असं पकंजा मुंडे आपल्या भावासंदर्भात म्हणाल्या.

Published on: May 30, 2025 04:06 PM