Nashik | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना अटकेवर पंकजा मुंडे म्हणतात…
कोणताही शत्रू शुद्र नसतो. असा एकही व्यक्ती नाही, ज्याच्या मनात सल नाही. मात्र, हे सगळं बाजूला ठेवून परिवार म्हणून एकत्र काम करा. राजकारणात उदाहरण सेट करण्यासाठी चांगले लोक यावेत. अनिल देशमुख यांची अटक हा प्रक्रियेचा भाग आहे. ती सुरू आहे. मी जज नाही. त्याच्यावर जे बोलत आहेत, ते इतके बोलत आहेत की, मला बोलण्याची आवश्यकता नाही.
पंकजा म्हणाल्या, कोणताही शत्रू शुद्र नसतो. असा एकही व्यक्ती नाही, ज्याच्या मनात सल नाही. मात्र, हे सगळं बाजूला ठेवून परिवार म्हणून एकत्र काम करा. भाजप कार्यकर्त्यांच्या धमण्यांमधून संस्कार वाहतो. आमचा उमेदवार आघाडीवर असल्याचं जयकुमार भाऊंनी मला आता सांगितलं. मी मध्यप्रदेशची आहे ना, आता मी बाहेरची आहे. खरं सांगू, पण मला वाटलंच नाही मी बाहेर आहे. अस वाटलं मी माहेरीच आहे. राम मंदिराचे स्वप्न पूर्ण होईल असं कोणाला वाटलं नव्हतं, पण ते आता होतंय, हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत. सध्या राज्यात सुरू असलेल्या अनेक घडामोडींवरही पकंजा मुंडे यांनी आपल्या सूचक शब्दांमधून भाष्य केले. त्या म्हणाल्या, राजकारणात उदाहरण सेट करण्यासाठी चांगले लोक यावेत. अनिल देशमुख यांची अटक हा प्रक्रियेचा भाग आहे. ती सुरू आहे. मी जज नाही. त्याच्यावर जे बोलत आहेत, ते इतके बोलत आहेत की, मला बोलण्याची आवश्यकता नाही. मी पेन घेऊन बसलेले नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. मंत्री मंत्री झाल्यावर मी अनेक योजना नाशिकमध्ये राबवल्या. आज मी राष्ट्रीय सचिव म्हणून इथे आले आहे. येणाऱ्या काळात सार्वजनिक वाहतूक वाढवली पाहिजे. अशा बस उपलब्ध झाल्या, तर वाहतूक कोडींचा प्रश्न कमी होईल, असं म्हणत त्यांनी शहर बसचे कौतुक केले.