Pankaja Munde : सर्व तक्रारींची महिला आयोगाने दखल घेणं क्रमप्राप्त – पंकजा मुंडे

Pankaja Munde : सर्व तक्रारींची महिला आयोगाने दखल घेणं क्रमप्राप्त – पंकजा मुंडे

| Updated on: May 30, 2025 | 4:34 PM

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली असून महिला आयोगाच्या कारभारावर देखील भाष्य केलं आहे.

वैष्णवी हगवणेला न्याय मिळावा यासाठी प्रत्येक पाऊल उचलणं गरजेचं आहे. या प्रकरणाबाबतचा सर्व निर्णय मुख्यमंत्री घेतील असं मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हंटलं आहे. तर तक्रार कुठलीही असली तरी महिला आयोगाने दखल घेणं क्रमप्राप्त आहे, असंही यावेळी बोलताना मुंडे यांनी म्हंटलं आहे.

वैष्णवी हगवणेने सासरी हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींची अनेक प्रकरणे उघड झाली आहे. वैष्णवीच्या माहेरच्या लोकांनी हगवणे कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केलेले आहेत. त्यानंतर त्यांना अटक देखील करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकारानंतर राज्यभरतून संताप व्यक्त केला जात आहे. तर वैष्णवीच्या मोठ्या जावेने राज्य महिला आयोगाकडे स्वत:वर होणाऱ्या छळची तक्रार देखील केली होती. मात्र त्यावर कोणतीही दखल महिला आयोगाने घेतलेली नव्हती. याच पार्श्वभूमीवर आज मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली.

Published on: May 30, 2025 04:34 PM