रॅलीदरम्यान वाहनं थांबवली अन्…. ठाकरेंची सेना आणि भाजप आमने-सामने, पनवेलमध्ये प्रचार तापला

रॅलीदरम्यान वाहनं थांबवली अन्…. ठाकरेंची सेना आणि भाजप आमने-सामने, पनवेलमध्ये प्रचार तापला

| Updated on: Jan 06, 2026 | 5:08 PM

पनवेल प्रभाग क्रमांक 5 मध्ये प्रचाररॅलीदरम्यान ठाकरे सेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी वाहन थांबवून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, ज्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. हा प्रकार पनवेल प्रभाग पाचमध्ये घडला.

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात राजकीय पक्षांच्या प्रचाराला जोरदार सुरूवात झाली आहे. सगळीकडे सर्वंच राजकीय पक्षांनी जोर लावून प्रचार सुरू केलाय. त्यातूनच पनवेलच्या प्रभाग क्र. 5 मधील प्रचारादरम्यान ठाकरे सेना आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आलेत. यावेळी प्रचार रॅलीदरम्यान वाहनं थांबवून, दोन्ही पक्षांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एकमेकांच्या विरोधात घोषणा देत ठाकरे सेना आणि भाजपात काहीसा राडा झाला आणि त्यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले.

तर दुसरीकडे अकोल्यात उमेदवारी नाकारल्याने भाजपमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. पक्षाच्या सरचिटणीसांनी तिकीट नाकारल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. माजी सभापतींना उमेदवारी न दिल्याने त्यांनी पक्षाला याचे कारण विचारले आहे. राजीनाम्याच्या वेळी सरचिटणीसांनी पत्राद्वारे आपली खंत व्यक्त केली. “आपली पक्षावर कधीही नाराजी नव्हती आणि आजही नाही. मात्र मला माझे तिकीट का कापले आणि ज्या व्यक्तीला मी दोन वेळा पराभूत केले, त्याला पक्षात घेऊन तिकीट का दिले, याचे उत्तर हवे आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

Published on: Jan 06, 2026 05:08 PM