परभणीत चंद्रशेखर बावनकुळेंचा ताफा अडवला, पोलिस-आंदोलकांत बाचाबाची, आणखी काय Updates?

| Updated on: Dec 13, 2022 | 1:37 PM

आंदोलक आक्रमक होताच पोलिसांनी तत्काळ त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कारवाई केली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बराच वेळ बाचाबाची झाली.

Follow us on

परभणीः महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आज पुण्यात आक्रमक झाली असतानाच परभणीत देखील भाजपविरोधी जोरदार आंदोलन करण्यात आलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे आज एक दिवसाच्या परभणी दौऱ्यावर होते. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. परभणी शहरातील वसंतराव नाईक पुतळा पळा परिसरात दलित संघटनांकडून हा निषेध व्यक्त करण्यात आला.  बावनकुळे यांच्या दौऱ्यानिमित्त शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलक आक्रमक होताच पोलिसांनी तत्काळ त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कारवाई केली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बराच वेळ बाचाबाची झाली.