VIDEO : Mahabaleshwar | महाबळेश्वरमध्ये हॉटेल व्यवसायाला परवानगी, नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची माहिती

| Updated on: Jun 19, 2021 | 1:56 PM

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील पर्यटनस्थळं सुरु करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवरुन घेतला जात आहे. मात्र, त्यासाठीही काही अटीशर्थी, कोरोना नियमावली आखून देण्यात येत आहे.

Follow us on

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील पर्यटनस्थळं सुरु करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवरुन घेतला जात आहे. मात्र, त्यासाठीही काही अटीशर्थी, कोरोना नियमावली आखून देण्यात येत आहे. त्यासंदर्भात कालच साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महाबळेश्वमध्ये पर्यटनस्थळांना परवानगी दिली होती. मात्र, आज तो निर्णय मागे घेण्यात आला आहे.

पर्यटनाचे सर्व पाॅईट बंद राहणार आहे. नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी ही माहीती दिली आहे. बाजार पेठेतील दुकानदारांनाही कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. व्यापारी आणि हॉटेल मधील कामगार यांची दर दहा दिवसांनी कोरोना तपासणी करण्यात येईल. करोना बाबतचे सर्व नियम हॉटेल व्यवसायिक आणि व्यापारी यांच्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहेत.