Kolhapur Breaking | कोल्हापुरात सर्वसामान्यांसाठी पेट्रोल बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

| Updated on: Jul 23, 2021 | 5:14 PM

कोल्हापुरात आता सर्वसामान्यांना पेट्रोल मिळणार नाहीय. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच पेट्रोलचा पुरवठा केला जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापनच्या वाहनांनाच केवळ इंधनाचा पुरवठा होणार आहे.

Follow us on

कोल्हापुरात आता सर्वसामान्यांना पेट्रोल मिळणार नाहीय. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच पेट्रोलचा पुरवठा केला जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापनच्या वाहनांनाच केवळ इंधनाचा पुरवठा होणार आहे. पूरस्थितीमुळे अशा प्रकारचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे. पूरस्थिती गंभीर होत असताना, लोक अनावश्यक बाहेर फिरत असल्याने जिल्हा प्रशासने हा निर्णय घेतला आहे.  गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्र व कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत चालली आहे.त्यामुळे आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीतील पाण्याने इशारा पातळी ओलांडली आहे.