Mumbai | Fuel Price Hike | मुंबईत इंधनाच्या दरात पुन्हा वाढ, महागाईचा भडका
मुंबईमध्ये पेट्रोल डिझेलचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. पेट्रोल डिझेलच्या दरांनी पुन्हा नवी उंची गाठल्याने सामान्याची आर्थिक गणितं बिघडली आहेत.
एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे हैरान झालेले नागरिक महागाईमुळेही त्रस्त झाले आहेत. त्यातच मुंबईमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने सामान्याची आर्थिक गणितं बिघडू लागली आहेत. मुंबईतील पेट्रोलचा भाव थेट 103 वर पोहोचला आहे. तर डिझेलची किंमतही 95 वर पोहचली आहे. मागील काही काळातील ही 14 वी दरवाढ असल्याने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
