“लाव रे तो व्हिडीओ” म्हणत फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर सभेत थेट हल्लाबोल

“लाव रे तो व्हिडीओ” म्हणत फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर सभेत थेट हल्लाबोल

| Updated on: Jan 13, 2026 | 10:50 AM

शिवतीर्थावरील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लाव रे ते व्हिडोओ' म्हणत राज आणि उद्धव ठाकरेंचे एकमेकांवरील टीकेचे जुने व्हिडीओ भर सभेत दाखवले. उत्तर हे ठाकरे बंधूंनीच दिलंय असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना चांगलचं डिवचलं आहे.

शिवतीर्थावरील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लाव रे ते व्हिडोओ’ म्हणत राज आणि उद्धव ठाकरेंचे एकमेकांवरील टीकेचे जुने व्हिडीओ भर सभेत दाखवले. उत्तर हे ठाकरे बंधूंनीच दिलंय असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंना चांगलचं डिवचलं आहे. मी कोणाकडून तरी शब्द उधार घेतो आणि म्हणतो जरा ‘लाव रे तो व्हिडोओ’ असं म्हणत फडणवीस यांनी ठाकरे बंधूंचे व्हिडीओ लावून एकच खळबळ उडवून दिली. या दोघांनी एकमेकांची पोलखोल केली आहे. आता तुमचं तुम्हीच ठरवा, असं आवाहनही त्यांनी मतदारांना केलंय.

Published on: Jan 13, 2026 10:50 AM