PM Mudra Yojana : पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?

PM Mudra Yojana : पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?

| Updated on: May 04, 2025 | 12:18 PM

पंतप्रधान मुद्रा लोन योजनेमुळे अनेक उद्योजकांचं नशीब पालटलंय. अनेकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असते, पण त्यासाठी लागणारं भांडवल त्यांच्याकडे नसतं. अशावेळी ही योजना त्यांच्या कामी येत आहे. या योजनेला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली आहेत.

पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत गेल्या दहा वर्षांत तब्बल 33 लाख कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं आहे. या योजनेला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. 8 एप्रिल 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही योजना सुरू केली होती. मोदी यांच्या महत्त्वकांक्षी योजनांपैकी ही एक मानली जाते. अनेकांना उद्योग व्यवसाय करण्याची इच्छा असते. पण भांडवल हा मोठा प्रश्न असतो. त्यावर मात करण्यासाठी मोदींनी ही योजना आणली. मुद्रा योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी लोकांनी सरकारकडून कर्ज घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरू केला. या योजनेमुळे अनेक नॉन-कॉर्पोरेट, अकृषक, मध्यम, लघू आणि कुटीर उद्योजकांना मोठं पाठबळ मिळालंय. शिवणकाम युनिट्स आणि चहाच्या टपऱ्यांपासून ते हेअर सलॉन, मेकॅनिकचं दुकान आणि मोबाईल रिपेअरिंग व्यवसायांपर्यंत कोट्यवधी लघू उद्योजकांनी आत्मविश्वासाने कॉर्पोरेट जगात त्यांचा ठसा उमटवलाय. या योजनेअंतर्गत कर्जासाठी कसा अर्ज करायचा, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतील आणि कर्जाची प्रक्रिया कशी असते, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात..

Published on: May 04, 2025 12:18 PM