PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर
महाराष्ट्र दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आलेले आहेत. यावेळी ते पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे उद्घाटन करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र दिनी ते मुंबई दौऱ्यावर असून मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे भारतातील पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्हज २०२५) उद्घाटन करणार आहेत. “कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज” या घोषवाक्याने प्रेरित १ ते ४ मे दरम्यान या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातील निर्माते, स्टार्टअप्स, उद्योजक आणि धोरणकर्ते एकत्र येणार आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव देखील या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित असतील.
Published on: May 01, 2025 09:14 AM
