PM Modi : दहशतवाद संपवण्यासाठी आम्ही…, पुन्हा एकदा मोदींनी पाकिस्तानची उडवली झोप; काय दिला इशारा?

PM Modi : दहशतवाद संपवण्यासाठी आम्ही…, पुन्हा एकदा मोदींनी पाकिस्तानची उडवली झोप; काय दिला इशारा?

| Updated on: May 03, 2025 | 3:12 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हैदराबाद हाऊस येथे अंगोलाचे अध्यक्ष जोआओ मॅन्युएल लॉरेन्को यांची भेट घेतली. या काळात दोन्ही देशांच्या नेत्यांनी द्विपक्षीय बैठकही घेतली. बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी पहलगाम हल्ल्याचा उल्लेख केला आणि म्हणाले की, दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे.

भारत आणि पाकिस्तानचा तणाव दिवसेंदिवस शिगेला पोहोचत असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. दहशतवाद संपवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानची झोप उडवली असल्याचे दिसत आहे. तर दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांना धडा शिकवणार असल्याचे वक्तव्य करत मोदींनी पाकिस्तानला एकप्रकारे इशाराच दिला आहे. तर दहशतवादाविरोधात लढाई कायम असेल. दहशतवाद हा मानवतेसाठी धोकादायक असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी असे म्हटले की, दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात झालेल्या जीवितहानीबद्दल राष्ट्रपती लॉरेन्को आणि अंगोलाने व्यक्त केलेल्या शोकसंवेदनाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. हैदराबाद हाऊस येथे अंगोलाचे अध्यक्ष लॉरेन्को यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात हे वक्तव्य केले.

Published on: May 03, 2025 03:11 PM