PM Narendra Modi : लतादीदींच्या नावाने मिळणारा पुरस्कार जनतेला अर्पण करतो : पंतप्रधान मोदी

| Updated on: Apr 24, 2022 | 8:20 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी लतादीदींच्या आठवणींनी भावुक झाले. ते म्हणाले, मोठी बहीण म्हणून लतादीदींनी खूप प्रेम दिलं.

Follow us on

मुंबईः लदादीदींच्या नावाने मिळणारा पहिला पुरस्कार (Award) मी जनतेला अर्पण करतो. ज्याप्रमाणे लतादीदी जनतेच्या होत्या. त्याचप्रमाणे हा पुरस्कारही जनतेचा आहे, असे भावोदगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात पहिल्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने (Lata Deenanath Mangeshkar Award) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा आज रविवारी, 24 एप्रिल रोजी सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री सुभाष देसाई, मंगेशकर कुटुंबीय आणि कलाक्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी लतादीदींच्या आठवणींनी भावुक झाले. ते म्हणाले, मोठी बहीण म्हणून लतादीदींनी खूप प्रेम दिलं. यापेक्षा जीवनाचं सार्थक काय असेल. जेव्हा रक्षाबंधन येईल तेव्हा दीदी नसेल. मी पुरस्कार घेत नाही, पण बहिणीच्या नावाने पुरस्कार मिळतो. त्यामुळे मी आलो. मंगेशकर कुटुंबावर माझ्यावर हक्क आहे. आदिनाथचा मेसेज आला. तेव्हा मी किती बिझी आहे हे पाहिलं नाही. म्हटलं होकार द्या. मला नकार देणं शक्य नाही. मी हा पुरस्कार जनतेला अर्पित करतो.