WAVES 2025 : ‘या भूमीतील सर्व बंधू भगिनींना..’, पंतप्रधान मोदींचं वेव्हज समिटमध्ये मराठीतून भाषण
PM Narendra Modi Speech News : भारतातील पहिल्या जागतिक ऑडिओ – विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण..
न्यूज 9 ने भारतातील पहिल्या जागतिक ऑडिओ – विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषद (WAVES-2025) आजपासून जिओ कनव्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. या चार दिवशीय परिषदेचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. आज महाराष्ट्र दिन असल्याने आपलं भाषण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून सुरू करत सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर आज गुजराती दिवस देखील असल्याने गुजरातीमधून देखील पंतप्रधान मोदींनी भाषणाची सुरुवात केलेली बघायला मिळाली.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या भूमीतील सर्व बंधू भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
आज गुजरातचाही स्थापना दिवस आहे. जगभरात असलेल्या गुजराती भावा बहिणींनाही गुजरात स्थापना दिवसाच्या शुभेच्छा, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.
पुढे पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितलं की, मुंबईत १०० हून अधिक देशाचे आर्टिस्ट, इनोव्हेटर, इनव्हेस्टर आणि पॉलिसी मेकर एकत्र आले आहेत. एक प्रकारे या ठिकाणी ग्लोबल टॅलेंट आणि ग्लोबल क्रिएटिव्हीटीच्या ग्लोबल इको सिस्टिमची पायाभरणी होत आहे. वेव्हज ही केवळ अक्रोनेम नाहीये. हे खरोखरच एक वेव आहे. कल्चरची, क्रिएटिव्हिटीची आणि यूनिव्हर्सल कनेक्टची. यात सिनेमा, संगीत, गेमिंग, अॅनिमेशन, स्टोरीटेलिंग… क्रिएटिव्हीटाचं जगच आहे. वेव्ह ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे. तुमच्यासारख्या प्रत्येक आर्टिस्ट आणि क्रिएटरचा आहे. नव्या आयडिया घेऊन क्रिएटवर्ल्डशी आर्टिस्ट जोडला जाईल. या ऐतिहासिक सुरुवातीसाठी मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो. तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो.
