PM Modi Full Speech: ऑपरेशन सिंदूर, विकसित भारत, RSS चं कौतुक अन् पाकला इशारा, लाल किल्ल्यावरून मोदींनी काय-काय म्हटलं?

PM Modi Full Speech: ऑपरेशन सिंदूर, विकसित भारत, RSS चं कौतुक अन् पाकला इशारा, लाल किल्ल्यावरून मोदींनी काय-काय म्हटलं?

| Updated on: Aug 15, 2025 | 10:12 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी सलग १२ व्या वेळी ध्वजारोहण केले. तसेच, एमआय-१७ हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. बघा मोदींचे पूर्ण भाषण

संपूर्ण देशभरात आज भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत आहे. याचनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावला. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची थीम ही ‘नवा भारत’ अशी आहे. दरम्यान, यंदाचा स्वातंत्र्यदिनाचा सोहळा भव्य करण्यासाठी तब्बल ५ हजार विशेष पाहुण्यांना नवी दिल्ली येथे स्वातंत्र्यदिनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. लाल किल्ल्याभोवती आणि परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.

पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. भारत आता अणु धमक्यांना घाबरणार नाही. आम्ही कोणतंही ब्लॅकमेलिंग खपवून घेणार नाही आणि योग्यवेळी योग्य प्रत्युत्तर दिले जाईल, असं मोदींनी सांगितले. यासह सिंधू पाणी कराराबाबत मोदींनी पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारलं आणि सांगितलं की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकणार नाही. हे सांगत असताना मोदींनी भारताचं सामर्थ्य आणि ताकद नेमकी काय? यावरही भाष्य केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, भारत मेड इन इंडिया लढाऊ विमानांवर काम करत आहोत. समुद्रात असलेल्या खजिन्यांचाही शोध घेत आहोत. इतकंच नाहीतर खनिजांच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होत आहोत. यूपीआय जगाला आश्चर्यचकित करत आहे. भारत आपल्या अंतराळ केंद्रासाठी काम करत आहे. तर आयटी क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचे आवाहन करत देशाच्या गरजेनुसार खते, फर्टिलायजर बनवण्याचे आवाहनही मोदींनी केले.

Published on: Aug 15, 2025 08:30 AM