Ravindra Dhangekar | पुण्यात भाजपचं नेतृत्व मंगळसूत्र चोर करतायत?; धंगेकरांचा घणाघाती हल्ला
मंगळसूत्र चोरांच्या ताब्यात पुणे दिलयं. त्यामुळे पैसे खाणं आणि भ्रष्टाचार करणं असं नेतृत्व पुणे शहराचं दिसून येतंय. पुणेकरांनी यामध्ये लक्ष द्यावं नाहीतर भविष्यात समाज सेवा करायला वेळ भेटणार नाही. गरीब कार्यकर्ता भविष्यात नेतृत्व करणार नाही.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेसोबत युती होणार होती. परंतु अंतिम टप्प्यात युती झाली नाही. यावर भाजप आणि शिवसेनेसोबत युती करणार नाही हे शिवसेना गटाचे रविंद्र धंगेकर आधीच म्हणाले होते. भाजप शिवसेनेला फसवणार हे धंगेकरांनी त्यांच्या लोकांना आधीच सांगितलं होतं. शेवटच्या दहा मिनिटात एबी फॉर्म्स पोहोचवायला ही वेळ मिळाला नाही. भाजप विश्वासाला पात्र नाही, त्यांनी आम्हाला फसवलं आहे, असं देखील धंगेकर म्हणाले. पुण्यात भाजपचं नेतृत्व मंगळसूत्र चोर करतायत असा टोला धंगेकरांनी लगावला आहे.
मंगळसूत्र चोरांच्या ताब्यात पुणे दिलयं. त्यामुळे पैसे खाणं आणि भ्रष्टाचार करणं असं नेतृत्व पुणे शहराचं दिसून येतंय. पुणेकरांनी यामध्ये लक्ष द्यावं नाहीतर भविष्यात समाज सेवा करायला वेळ भेटणार नाही. गरीब कार्यकर्ता भविष्यात नेतृत्व करणार नाही, असं देखील धंगेकर म्हणाले. पुणेकर एकनाथ शिंदेंना चांगली भेट देतील, असा विश्वास रविंद्र धंगेकरांनी व्यक्त केला आहे.
