India-Pakistan Border Tension : युद्धाची चाहूल? पीओकेमध्ये पळापळ, रेशनची साठवणूक, मदरशे बंद

India-Pakistan Border Tension : युद्धाची चाहूल? पीओकेमध्ये पळापळ, रेशनची साठवणूक, मदरशे बंद

| Updated on: May 05, 2025 | 1:20 PM

PoK Emergency Preparedness : पाकिस्तानच्या मुजफ्फराबादमध्ये किराणा साठवणूक केली जाते आहे. भारत पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पीओकेसुद्धा घाबरला आहे.

पाकिस्तानच्या मुजफ्फराबादमध्ये किराणा साठवणूक केली जाते आहे. सरकारी गोदामांमध्ये किराणा साठवणुकीसाठी पळापळ सुरू आहे. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पीओकेसुद्धा घाबरला आहे. पीओकेची राजधानी मुजफ्फराबादमध्ये धान्य साठवणुकीसाठी घाई सुरू आहे. भारताच्या कारवाईची पीओकेला सर्वात जास्त भीती आहे. सरकारी गोदामांमध्ये पुढच्या 2 महिन्यांच्या रेशनची साठवणूक सुरू झाली आहे. पीओकेचे पंतप्रधान चौधरी अन्वरुल हक यांच्याकडून तसे आदेश देण्यात आलेले आहेत. 2 महिन्याच्या भाज्या, अन्न, औषध, धान्याची साठवणूक सुरू आहे. इतकंच नाही तर पीओकेमधले मदरसे 10 दिवस बंद असणार आहेत. मदरशात शिकणाऱ्या मुलांना सैनिकी प्रशिक्षण दिलं जाईल. पीओकेमधले गेस्ट हाऊस, हॉटेल्स देखील सैन्याला देण्यात आलेले आहे. पीओकेतली निळं व्हॅली आणि 13 पर्यटन स्थळं बंद असतील.

Published on: May 05, 2025 01:08 PM