बेस्ट बस कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संप, मालवणी डेपोत पोलीस बंदोबस्त; प्रवाशांच्या अडचणीत वाढ

| Updated on: Aug 08, 2023 | 10:40 AM

बेस्ट बस कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम मालवणी डेपोवरही दिसून येत आहे. आगारात बसची संख्या कमी असल्याने प्रवाशात संतोष निर्माण होत आहे. येथे प्रवाशी मोठ्या संख्येने बसची वाट पाहताना दिसत आहेत.

Follow us on

मुंबई, 8 ऑगस्ट 2023 | मुंबईमध्ये बेस्ट बस कंत्राटी कर्मचारी गेल्या 7 दिवसांपासून काम बंद संपावर आहेत. त्याचा थेट परिणाम हा उपमगर आणि मुंबईतील चाकरमान्यांवर होत आहे. तर याचा थेट परिणाम आता बेस्टच्या बस डेपोवरही होताना दिसत आहे. तर बेस्ट बस कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम मालवणी डेपोवरही दिसून येत आहे. आगारात बसची संख्या कमी असल्याने प्रवाशात संतोष निर्माण होत आहे. येथे प्रवाशी मोठ्या संख्येने बसची वाट पाहताना दिसत आहेत. तर मालवणी डेपोत कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर मालवणी परिसरातील चाकरमाने मोठ्या संख्येने कामानिमित्त बाहेर पडत आहेत. मात्र बस कमी असल्याने ती कमी होताना काही दिसत नाही. दरम्यान दोन दिवसांपूर्वी या डिपोमध्ये झालेल्या गोंधळानंतर आज काही कर्मचाऱ्यांना मालवणी पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. दरम्यान आता बेस्ट बसच्या संपामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत.