Sanjay Raut | ED आणिCBI च्या कारवायांना राजकीय रंग – संजय राऊत

| Updated on: Aug 31, 2021 | 3:59 PM

अनिल परब यांना ईडी नोटीस आली, मात्र ते आज जाणार नाहीत. ईडी काय करतेय, सीबीआय काय करतेय? कुणाला वॉरंट जातंय, कुणाची संपत्ती जप्त होतेय, याची यादी भाजपवाले सोशल मीडियावर टाकत आहेत. ईडी भाजप चालवतेय का भाजपला ईडी चालवतेय?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

Follow us on

महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Corona Third wave) उंबरठ्यावर आहे. मात्र भाजपवाले मंदिरं उघडण्यासाठी (Temple reopen ) आंदोलनं करत आहेत. पण काळजी घेण्याचं आवाहन, नियमावली केंद्राने पाठवली आहे. जर भाजप नेत्यांवर कारवाई केली तर हे आम्हाला हिंदुत्वविरोधी ठरवतील. आता अमित शाहांच्या गृहखात्याने नियमावली जारी केली आहे, त्यांनाही तुम्ही हिंदुत्वविरोधी ठरवणार का असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला विचारला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. नोटीस येत आहेत, त्याबाबत राजकीय दबाव आहे. एका पक्षाचे, भाजपचे नेते सोशल मीडियावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची यादी जाहीर करत आहेत, यांना ईडी बोलवणार. हे ईडीचं समन्स आहे की भाजपचं हा संभ्रम आहे. भाजपचे प्रमुख लोक शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या १० लोकांची यादी जाहीर केली, भाजपचे लोक ईडी कार्यालयात बसले की ईडीचे लोक भाजप कार्यालयात हे शोधण्याची गरज आहे. अनिल परब यांना ईडी नोटीस आली, मात्र ते आज जाणार नाहीत. ईडी काय करतेय, सीबीआय काय करतेय? कुणाला वॉरंट जातंय, कुणाची संपत्ती जप्त होतेय, याची यादी भाजपवाले सोशल मीडियावर टाकत आहेत. ईडी भाजप चालवतेय का भाजपला ईडी चालवतेय?