Rana Statement : बिबटे अन् पोट्टे… हिंदूंनो चार मुलं जन्माला घाला, नवनीत राणांचं आवाहन तर रवी राणांची बिबट्याबाबत अजब मागणी

| Updated on: Dec 24, 2025 | 11:44 AM

माजी खासदार नवनीत राणा यांनी मौलवीच्या वक्तव्याचा दाखला देत हिंदूंनी किमान चार मुलांना जन्म द्यावा, असे आवाहन केले आहे. तर त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा देण्याची मागणी केली आहे. या दोन्ही विधानांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी हिंदूंना किमान चार मुलांना जन्म देण्याचे आवाहन केले आहे. एका मौलवीच्या वक्तव्याचा दाखला देत, त्यांनी लोकसंख्या वाढीचा मुद्दा उपस्थित केला. हिंदूंनी एका मुलावर समाधान मानू नये, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, नवनीत राणा यांचे पती आणि आमदार रवी राणा यांनीही एक वेगळी मागणी केली आहे. मनुष्य वस्तीत वारंवार येणाऱ्या बिबट्यांना पाळीव प्राण्याचा दर्जा देऊन लहानपणापासून सांभाळल्यास ते चांगले टिकतील, असे त्यांनी म्हटले आहे. या दोन्ही राणा दाम्पत्याच्या विधानांमुळे विरोधाभास निर्माण झाला असून, त्यांच्या राजकीय भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भाजपच्या वनमंत्र्यांना बिबट्यांच्या वाढत्या संख्येची चिंता असताना, रवी राणा बिबट्यांना पाळीव करण्याबाबत बोलत आहेत.

Published on: Dec 24, 2025 11:44 AM