Raj Thackeray | लवचिक भूमिका घेतली तर… राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिंदे आणि मनसेच्या युतीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच अप्रत्यक्ष भाष्य केलं आहे. राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्ताने ट्विट करून हे भाष्य केलं आहे. हे भाष्य करताना राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या राजकारणाचे दाखलेही दिले आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिंदे आणि मनसेच्या युतीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच अप्रत्यक्ष भाष्य केलं आहे. राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्ताने ट्विट करून हे भाष्य केलं आहे. हे भाष्य करताना राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या राजकारणाचे दाखलेही दिले आहेत. ‘आरपार बदललेल्या राजकारणामध्ये कधीतरी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी आणि स्वार्थासाठी कधीही नसेल,’ असं सूचक ट्विट राज ठाकरेंनी केलं आहे, ‘आज निष्ठा सहज विकल्या जातात, तत्त्व सहज फेकली जातात आणि राजकारण हे पूर्णपणे व्यवहारी झालंय’ असंही ठाकरे म्हणाले.
त्याचबरोबर महापालिकेच्या निकालानंतर बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त आज ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. माटुंग्याच्या षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने ठाकरे बंधू मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे राज्यातील पराभव आणि त्यानंतर झालेल्या युती, आघाड्यांवर दोन्ही ठाकरे बंधू काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
