2 मुलींवर अत्याचार, पोक्सोचा गुन्हा अन् गिरीश महाजनांसोबत फोटो; प्रफुल लोढा आहे तरी कोण?

2 मुलींवर अत्याचार, पोक्सोचा गुन्हा अन् गिरीश महाजनांसोबत फोटो; प्रफुल लोढा आहे तरी कोण?

| Updated on: Jul 21, 2025 | 9:54 AM

खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये गिरीश महाजन यांच्यासोबत प्रफुल लोढा दिसून येत आहेत.

नोकरीचं आमिष दाखवून 2 मुलींवर अत्याचार करणाऱ्या प्रफुल लोढावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रफुल लोढा सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मुलींवर अत्याचार करून फोटो असल्याची धमकी देत खंडणी देखील उकळण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही मुलींच्या तक्रारीवरून साकीनाका आणि एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, पीडित अल्पवयीन असल्याने लोढावर पोक्सोअंतर्गत देखील गुन्हा दाखल झाला आहे.

तर खडसेंनी केलेल्या दाव्यानुसार प्रफुल लोढा हे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती आहेत. याआधी प्रफुल लोढांनी महाजनांवर गंभीर आरोप केल्याचा देखील दावा खडसेंनी केला आहे. प्रफुल लोढांना लोकसभा निवडणूक 2024ला वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी देखील देण्यात आली होती. मात्र अवघ्या पाच दिवसातच लोढा यांच्याकडून उमेदवारी मागे घेण्यात आली. महाजन यानी लोढांना भाजपामध्ये प्रवेश दिला होता, असा आरोप देखील खडसेंनी केला आहे.

Published on: Jul 21, 2025 09:54 AM