हम भी मुख्यमंत्री बनना चाहते है- बच्चू कडू
Bacchu Kadu on Maharashtra CM : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याची इच्छा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. अमरावतीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली. पाहा व्हीडिओ...
अमरावती : प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अमरावतीतील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न बोलून दाखवलं आहे. “तुम अगर मुख्यमंत्री बनना चाहते हो, तो हम भी मुख्यमंत्री बनना चाहते है!”, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. शिवाय वारंवार गद्दारीच्या केल्या जाणाऱ्या आरोपांवरही त्यांनी भाष्य केलंय. “आमचा एक स्वतंत्र पक्ष आहे. आम्ही कुठेही जाऊ. त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणू नका”, असं म्हणत बच्चू कडू यांनी विरोधकांना ठणकावलं आहे.
Published on: Mar 06, 2023 07:19 AM
