Bachchu Kadu : आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर बच्चू कडू आक्रमक
Farmers Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून माजी आमदार बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत. प्रहारकडून कर्जमाफीसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे.
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून माजी आमदार बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यासाठी प्रहार संघटना राज्यभर आंदोलन करणार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलं आहे. 11 एप्रिलला आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवून हे आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्यातल्या शेतकऱ्यांना यंदा आणि पुढच्या वर्षी कर्जमाफी मिळणार नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. त्यानंतर आता प्रहारचे माजी आमदार बच्चू कडू आक्रमक झालेले आहेत. कर्जमाफीच्या मुद्यावरून कडू येत्या 11 एप्रिलला आंदोलन करणार आहे. प्रहार संघटनेकडून हे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
Published on: Mar 30, 2025 06:02 PM
