Prashant Koratkar : प्रशांत कोरटकर न्यायालयाबाहेर येताच शिवप्रेमी आक्रमक

Prashant Koratkar : प्रशांत कोरटकर न्यायालयाबाहेर येताच शिवप्रेमी आक्रमक

| Updated on: Mar 25, 2025 | 4:07 PM

Kolhapur News : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी न्यायालयाच्या परिसरात उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याला काल पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर आज त्याला कोल्हापूर सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी उपस्थित होते. प्रशांत कोटकर याला यावेळी चपला दाखवून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी उपस्थित होते की कोरटकर याला कोर्टाच्या मागच्या बाजूने अंत घेऊन जावे लागले. न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी कोरटकर याला सुनावली. त्यानंतर कोरटकरला घेऊन पोलीस न्यायालयाच्या बाहेर आल्यानंतर शिवप्रेमी आक्रमक झालेले बघायला मिळाले. जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत काहीसा आक्रमक पवित्रा शिवप्रेमींनी घेतल्यामुळे पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं.

Published on: Mar 25, 2025 04:05 PM