PM Narendra Modi यांची लता दीदींना श्रद्धांजली – Lata Mangeshkar Death
आपल्या जादूई आवाजाने जगभरातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसम्राज्ञी, भारत रत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. एका स्वर्गीय युगाचा अस्त झाला. त्यांच्या निधनावर जगभरातून शोक व्यक्त होत आहे.
आपल्या जादूई आवाजाने जगभरातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसम्राज्ञी, भारत रत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. एका स्वर्गीय युगाचा अस्त झाला. त्यांच्या निधनावर जगभरातून शोक व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी लतादीदींच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. माझ्याकडे भावना व्यक्त करायला शब्दच नाही. दयाळू आणि सर्वांची देखभाल करणाऱ्या लतादीदी आपल्याला सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने देशात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते कधीच भरून निघणारं नाही. आपल्या सूरेल आवाजाने लोकांना मंत्रमुग्ध करण्याची त्यांच्यात अद्वितीय क्षमता होती. भारतीय संस्कृतीच्या दिग्गज म्हणून येणारी पिढी त्यांना कायम स्मरणात ठेवेल, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. मोदींसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद (president ram nath kovind) यांनीही ट्विटरवरून लतादीदींना श्रद्धांजली वाहताना त्यांच्यासोबतचे फोटोही शेअर केले आहेत.
