पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट

पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट

| Updated on: Jan 30, 2026 | 3:07 PM

पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत गोविंद बाग निवासस्थानी शरद पवार यांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीचा व्हिडीओ समोर आला आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गोविंद बाग निवासस्थानी भेट घेतली. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सांत्वन करण्यासाठी चव्हाण यांनी ही भेट घेतली असल्याचं सांगितलं जात आहे.  या भेटीदरम्यान शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाण यांना अजित पवार यांच्या अपघाताविषयी माहिती दिली.

28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौऱ्यादरम्यान विमान अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. गुरुवारी अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बारामती येथे जाऊन शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांच्यात बातचीत देखील झाली. या भेटीचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

Published on: Jan 30, 2026 03:07 PM