पुणे शहरात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंद?; ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार

| Updated on: Apr 25, 2023 | 8:36 AM

पुणे शहरात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे.

Follow us on

पुणे : पुणे शहरात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेकडून पाणीपुरवठा संबंधात नियोजनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. पुणे महापालिका 31 ऑगस्ट पर्यंत च्या पाण्याची नियोजन करणार असल्याची माहिती आहे. यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने पुणे महापालिकेचे पाण्यासाठीचे नियोजन सुरू आहे. खडकवासला धरण साखळीमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र शहराला आठवड्यातून एकच दिवस पाणी कपातीची शक्यता आहे. कालवा समितीच्या बैठकीनंतर पुणे महापालिका घेणार याबाबत अधिकृत निर्णय घेण्यात येणार आहे. तर पुणे शहराचा पाणीपुरवठा या गुरुवारी राहणार बंद आहे. महापालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रे आणि टाक्यांच्या दुरुस्तीसाठी येत्या गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पाणीपुरवठा विभागचे प्रमुख पावसकर यांनी ही माहिती दिली आहे. गुरुवारी दिवसभर पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे शहरातील सर्व पेठा, स्वारगेट, धायरी ,कात्रज ,हडपसर ,वारजे औंध, वाघोली या सर्व भागात गुरुवारी पाणी बंद राहणार आहे.