Pune Crime :  अत्यंत शांत स्वभाव अन्… खासगी क्लासमध्ये वाद विकोपाला अन् विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया

Pune Crime : अत्यंत शांत स्वभाव अन्… खासगी क्लासमध्ये वाद विकोपाला अन् विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया

| Updated on: Dec 15, 2025 | 6:24 PM

पुण्यातील राजगुरूनगर येथे एका खासगी क्लासमध्ये दोन विद्यार्थ्यांमधील वादामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. मृत विद्यार्थ्याच्या वडिलांनी आपल्या मुलाच्या शांत स्वभावावर भर देत, हा पूर्वनियोजित हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी मारेकऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

पुण्यातील राजगुरूनगर येथे एका खाजगी क्लासमध्ये विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादानंतर एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत विद्यार्थी दहावीत शिकणारा पुष्कर होता. क्लासमध्येच एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर हल्ला केला होता, ज्यामध्ये पुष्करला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर मृत विद्यार्थ्याचे वडील अत्यंत व्यथित झाले आहेत. त्यांना सुरुवातीला मुलांची भांडणे झाल्याची आणि त्याला रुग्णालयात नेल्याची माहिती मिळाली होती. मात्र, काही वेळाने मुलाच्या मृत्यूची बातमी त्यांना मिळाली. वडिलांच्या म्हणण्यानुसार, त्यांचा मुलगा पुष्कर अत्यंत शांत स्वभावाचा होता आणि तो कधीही भांडण करत नव्हता. क्लासमध्ये धारदार शस्त्र कसे आले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. हा पूर्वनियोजित हल्ला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला असून, मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Published on: Dec 15, 2025 06:24 PM