Yavat CCTV : मोठा जमाव, प्रत्येकाच्या हाती दगडं अन्… दौंडच्या यवतमधल्या राड्याचा CCTV पाहिलात? आतापर्यंत 15 जणं ताब्यात
यवत मधल्या हिंसाचारांचा सीसीटीव्ही समोर आलेला आहे. काल येवत मध्ये दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मोठ्या संख्येने जमाव सीसीटीव्हीमध्ये दिसून येतोय. १५ जणांना ताब्यात घेण्यात आलं असून सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्यांना अटक केली जाणार आहे.
पुणे जिल्ह्यातील यवत मधील हिंसाचारांचा सीसीटीव्ही समोर आलाय. या सीसीटीव्ही जमाव एका वाहनाची तोडफोड करताना दिसतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर यवतमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप या सत्ताधारी आमदारांची सभा झाली होती. या सभेनंतर एका तरुणाने अक्षेपार्ह व्हाट्सअप स्टेटस ठेवल्याचा आरोप आहे. या स्टेटसनंतरच यवतमध्ये हिंसाचाराला सुरुवात झाली. या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी एकूण १५ जणांना ताब्यात घेतले. सीसीटीव्ही दिसणाऱ्यांना ताब्यात घेणार असं पोलिसांनी सांगितलंय.
तर खबरदारीचा उपाय म्हणून यवत मध्ये जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलाय. यवत मधील शाळांना सुट्टी देण्यात आली. पोलिसांकडून ड्रोन कॅमेऱ्याद्वारेही नजर ठेवली जातेय. अशातच यवत हिंसाचार बद्दल शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलाय. राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा. राज्यात सामाजिक सलोखा राखला जावा. यवत प्रकरण संवेदनशीलपणे हाताळलं जावं, अशा मागण्या शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या आहेत.
