Pune Crime News : पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात एन्काऊंटर
Pune Gangster Encounter : पुण्यातील सराईत गुंडाचा काळ मध्यरात्री सोलापुरात एन्काऊंटर करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापूरात एन्काऊंटर करण्यात आला आहे. सोलापूर येथील लंबोटीजवळ पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (वय 23) असं या सराईत गुंडाचं नाव आहे.
शाहरुख हा फरार आरोपी होता. बऱ्याच दिवसांपासून पुणे पोलीस त्याच्या शोधत होते. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार होता. गेल्या काही दिवापासून तो सोलापुरातील लांबोटी गावाजवळ लपून बसला असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे त्याचा मुसक्या आवळण्यासाठी पुणे गुन्हे शाखेचे पथक काल मध्यरात्री लांबोटी येथे आले होते. यावेळी पोलिसांनी लपलेल्या घरात छापेमारी केली. छापेमारी करताना आरोपी शाहरुख शेखने पोलिसांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना शाहरुख उर्फ अट्टी शेख गंभीर जखमी झाला. गंभीर अवस्थेतच त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
