Pune Godown Fire | पुण्यातील भोरमध्ये शूटिंगच्या गोडाऊनला आग

Pune Godown Fire | पुण्यातील भोरमध्ये शूटिंगच्या गोडाऊनला आग

| Edited By: | Updated on: Jun 02, 2022 | 1:51 PM

पुण्यातल्या भोरमधील रामबाग इथं गोडाऊनमध्ये फिल्म शूटिंगच सामान ठेवण्यात आलं होतं. या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीमध्ये सुमारे 11 लाखांचं साहित्य जळून मोठं आर्थिक नुकसान झालंय.

पुण्यातल्या (Pune News) भोरमधील रामबाग इथे फिल्म शूटिंगच (Pune Fire News) सामान असलेल्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत संपूर्ण गोडावून (Bhor godown Fire) जळून खाक झालंय. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या आगीत जवळ जवळ 11 लाखांचं नुकसान झालंय.आगीचं कारणं अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग भडकली असणयाची शक्यताय. अग्निशामक दलाचे जवान आणि सह्याद्री रेस्क्यू टीम यांच्या 3 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. गोडाऊन मध्ये शूटिंगसाठी वापरले जाणारे कपडे, दागिने, टेबल, खुर्चीसह शूटिंगच्या सेटसाठी वापरल जाणारं साहित्य ठेवण्यात आलं होतं. आगीत हे संपूर्ण साहित्य जळून खाक झालाय.

Published on: Jun 02, 2022 01:49 PM