Video : इंदापूरच्या कडबनवाडीत विमान दुर्घटना, महिला पायलट किरकोळ जखमी

Video : इंदापूरच्या कडबनवाडीत विमान दुर्घटना, महिला पायलट किरकोळ जखमी

| Edited By: | Updated on: Jul 25, 2022 | 1:06 PM

कारवार एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान कडबनवाडी (Kadbanwadi) , ता. इंदापूर, जि. पुणे गावचे हद्दीत कोसळले. यामध्ये एक शिकाऊ महिला पायलट भाविका राठोड वय 22 वर्ष रा. पुणे किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कारवार एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान हे इंधन संपल्यामुळे कडबनवाडी गावचे हद्दीत (Plane Crash) कोसळले. कु. भविका राठोड या किरकोळ जखमी […]

कारवार एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान कडबनवाडी (Kadbanwadi) , ता. इंदापूर, जि. पुणे गावचे हद्दीत कोसळले. यामध्ये एक शिकाऊ महिला पायलट भाविका राठोड वय 22 वर्ष रा. पुणे किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कारवार एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान हे इंधन संपल्यामुळे कडबनवाडी गावचे हद्दीत (Plane Crash) कोसळले. कु. भविका राठोड या किरकोळ जखमी झाले असून त्यांना औषधउपचारासाठी नवजीवन हॉस्पिटल, शेळगाव या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. इतर कोणत्याही प्रकारची हानी नाही.  घटना ठिकाणी कारवार एव्हिएशन बारामती यांचे स्टाफ हजर असून योग्य बंदोबस्त घटनास्थळी ठेवला असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनातर्फे प्राप्त झाली आहे.

Published on: Jul 25, 2022 01:06 PM