Khadakvasla Dam : खडकवासला धरणातून पहिला विसर्ग; 2 हजार क्युसेकने मुठा नदीपत्रात पाणी सोडण्यास सुरुवात
Pune Rain Updates : खडकवासला धरणातून 1 हजार 920 क्युसेक्स वेगाने मुठा नदीच्या पत्रात विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे.
खडकवासला धरणातून 1 हजार 920 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पत्रात हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यंदाच्या पावसाळ्यातील हा पहिलाच विसर्ग असल्याने पाटबंधारे विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून विसर्ग सुरू करण्यापूर्वी जलपूजन केलं गेलं. त्यानंतर हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मूठा नदीच्या पत्रात होणारा हा विसर्ग पावसावर आधारित असणार आहे. सध्या तरी 1 हजार 920 क्युसेक वेगाने खडकवासला धरणातून विसर्ग सुरू झाला आहे.
दरम्यान, नदीकाठ परिसरातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. नदीकाठच्या परिसरामध्ये ज्यांची गाड्या आणि जनावर आहेत, त्या नागरिकांनी त्यांना सुरक्षित स्थळी हलवावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढविण्यात येणार आहे.
