Anjali Damania : पुणे जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानीच्या अटकेनंतर अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया, पहिला आरोपी म्हणजे…

Anjali Damania : पुणे जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानीच्या अटकेनंतर अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया, पहिला आरोपी म्हणजे…

| Updated on: Dec 03, 2025 | 9:37 PM

पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीला अटक झाली असली तरी, अंजली दमानिया यांनी याला थोड्याफार कारवाईचे प्रदर्शन म्हटले आहे. अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी, पार्थ पवार, दिग्विजय पाटील, कलेक्टर डुडी आणि अजित पवार यांच्यावर कारवाईची मागणी करत त्यांनी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.

पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीला अटक झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी या अटकेला केवळ थोड्याफार कारवाईचे प्रदर्शन म्हटले असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप बाहेर असल्याचे म्हटले आहे. दमानियांच्या मते, या गैरव्यवहारात अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी आणि तिचे भागीदार पार्थ पवार व दिग्विजय पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे. त्यांनी एफआयआरमध्ये अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी आणि तिच्या भागीदारांची नावे समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. दमानिया यांनी या प्रकरणात पालकमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकारची १८०० कोटी रुपयांची जमीन जात असताना पालकमंत्र्यांना याची माहिती नसेल, हे अमान्य असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे अजित पवारांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी थेट मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

Published on: Dec 03, 2025 09:37 PM