Pehalgam Terror Attack Updates : दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी

Pehalgam Terror Attack Updates : दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी

| Updated on: Apr 28, 2025 | 1:30 PM

Kishtwar Doda terror suspects raids : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सैन्यदल कामाला लागलं आहे. भारतात घर असलेल्या आणि पाकिस्तानात राहणाऱ्या अनेक दहशतवाद्यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे.

किश्तवाड, दोडासह विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर कारवाई सुरू करण्यात आली आहे. पाकिस्तानात राहणाऱ्या दहशतवाद्यांच्या भारतातील घरांवर छापे मारले जात आहेत. 13 वेगवेगळ्या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आलेली आहे. या तपासणीमधून काय समोर येतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला करत 26 पर्यटकांचा जीव घेतला होता. त्यानंतर भारतीय सैन्य दलाकडून या अतिरेक्यांचा शोध सुरू आहे. याच संदर्भात सैन्य दलाने काश्मीरच्या किश्तवाड, दोडासह 13 ठिकाणी अतिरेक्यांच्या घरांवर छापेमारी केली आहे.

Published on: Apr 28, 2025 01:30 PM