Raigad | कोकण रेल्वेच्या भरावामुळे पुराचा धोका, सुनील तटकरेंनी रेल्वे अधिकाऱ्यांना खडसावले
रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी आज कोकण रेल्वेचे मुख्य अभियंता आणि अन्य प्रमुख अधिकाऱ्यांसह रेल्वे ट्रॅकवरती उतरुन पहाणी करत माणगावमध्ये आढावा घेतला. यावेळी बाजूने असलेल्या नाल्याची कामे वर्षानुवर्ष झाली नसल्याने खासदार तटकरे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी करत तातडीने नाल्याची कामे करण्याच्या सूचना केल्या. | Raigad Konkan Railway Reveiwed by Sunil Tatkare
कोकणसाठी वरदान ठरलेल्या कोकण रेल्वे या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे काही ठिकाणी मात्र वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत. यापैकी एक म्हणजे पावसाळ्यात पुराचा धोका. रेल्वे प्रशासनाने दुपदरी ट्रॅक चे काम सुरु केल्यापासून रेल्वे ट्रॅक नजीक असणाऱ्या अनेक गावांना पावसाळ्यात पूराचा फटका बसतो. याबाबत वारंवार सूचना करुनही रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याने संताप निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी आज कोकण रेल्वेचे मुख्य अभियंता आणि अन्य प्रमुख अधिकाऱ्यांसह रेल्वे ट्रॅकवरती उतरुन पहाणी करत माणगावमध्ये आढावा घेतला. यावेळी बाजूने असलेल्या नाल्याची कामे वर्षानुवर्ष झाली नसल्याने खासदार तटकरे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी करत तातडीने नाल्याची कामे करण्याच्या सूचना केल्या. | Raigad Konkan Railway Reveiwed by Sunil Tatkare
