Raigad Crime : इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन
रायगडमधील रोहा शहरात आजीने आपल्या नातवासह आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यात आजी व नातू या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
रायगडमधील रोहा शहरात आजीने आपल्या नातवासह आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यात आजी व नातू या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत नातू हा सतत आजारी असायचा. त्याच्या आजारपणाला कंटाळून आजीने हे टोकाचं पाऊल उचलल आहे. आजीने आपल्या नातवासह इमारतीवरून उडी मारून आपलं जीवन संपवल. उर्मिला खोरे असं या 52 वर्षीय मयत आजीचं नाव आहे. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर नातवाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा देखील मृत्यू झाला.
Published on: Apr 09, 2025 04:23 PM
