VIDEO : UP मध्ये धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवल्याने Yogi सरकारचं Raj Thackeray यांच्याकडुन अभिनंदन

| Updated on: Apr 28, 2022 | 12:35 PM

औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांची परवानगी मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, पोलीस राज ठाकरे यांना नोटीस बजावणार आहेत. शिवाय त्यांच्यासमोर काही अटी आणि शर्थीही ठेवल्या जाणार आहेत. त्यानुसार सभेत ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे लागतील.

Follow us on

उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील मशिदींवरील भोंगे उतरवल्या बद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार राज ठाकरे यांनी मानले आहेत. तसेच पुढे राज ठाकरे म्हणाले की, आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये योगी कुणीच नाही आहेत ते फक्त सत्तेचे भोगी आहेत. असे म्हणता राज ठाकरे यांनी योगी करणारचे  कौतुक केले. इतकेच नव्हेतर राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाना देखील साधला. औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांची परवानगी मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, पोलीस राज ठाकरे यांना नोटीस बजावणार आहेत. शिवाय त्यांच्यासमोर काही अटी आणि शर्थीही ठेवल्या जाणार आहेत. त्यानुसार सभेत ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे लागतील. लहान मुले, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी लागेल. इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागेल.