Raj Thackeray Aurangabad Speech | राज ठाकरे यांनी सभेला सुरूवात करताच टोलेबाजी सुरु केली

Raj Thackeray Aurangabad Speech | राज ठाकरे यांनी सभेला सुरूवात करताच टोलेबाजी सुरु केली

| Updated on: May 01, 2022 | 10:07 PM

या पुढच्या सर्व सभा मराठवाड्यतील प्रत्येक जिल्ह्यात होणार. विदर्भातही जाणार. कोकणात, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही जाणार आहे. या सभांना आडकाठी आणून काही फायदा नाही. मी कुठेही बोललो तरी लोकांपर्यंत पोहोचणार आहे.

औरंगाबाद : जी काही उरली सुरली आहे. ती म्हटलं संभाजीनगरात काढू. दिलीप धोत्रेंनी सांगितलं संभाजीनगरला सभा घेऊया. संभाजी नगर हा तर महाराष्ट्राचा मध्य. मग मी त्याला सांगितलं. सभा घेऊ. पण तारीख सांगतो नंतर. हा विषय संभाजीनगर पुरता मर्यादित नाही. या पुढच्या सर्व सभा मराठवाड्यतील प्रत्येक जिल्ह्यात होणार. विदर्भातही जाणार. कोकणात, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही जाणार आहे. या सभांना आडकाठी आणून काही फायदा नाही. मी कुठेही बोललो तरी लोकांपर्यंत पोहोचणार आहे. कोंबडं झाकायचं ठरवलं तरी सूर्य उगवायचं थोडचं राहतं, सूर्य उगवतोच असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.