उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचे ‘ते’ 20 मिनिटं; दोन्ही भावांमध्ये काय झाली चर्चा? मोठी अपडेट आली समोर
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त काल राज ठाकरे मातोश्रीवर गेले असता दोन्ही भावांमध्ये काय चर्चा झाली याबद्दल आता माहिती समोर आली आहे.
उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त काल राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. यावेळी मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा देखील झाली असल्याची माहिती आता समोर आली आहे. दोन्ही भावांनी यावेळी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. या दोन्ही भावांच्या भेटीत कौटुंबिक चर्चा झाल्याची माहिती आहे.
मराठी विजय मेळाव्यानंतर काल उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. ही ठाकरे बंधूंची दुसरी भेट होती. त्यामुळे एकीकडे राजकीय चर्चा सुरू असतानाच दोन्ही भावांमध्ये काय बोलणं झालं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. आता यावर मोठी अपडेट समोर आली आहे. मातोश्रीवर काल बाळासाहेबांच्या खोलीत राज-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा झाली. यावेळी दोन्ही भावांकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेबांच्या खोलीत राज-उद्धव ठाकरेंमध्ये कौटुंबिक चर्चा देखील झाली. काही वेळानं रश्मी ठाकरेही बाळासाहेबांच्या खोलीत आल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर राऊत, नांदगावकर, अभ्यंकरही बाळासाहेबांच्या खोलीत आले होते.
