शरद पवारांसोबत झालेल्या मुलाखतीतील अनेक गोष्टींचा Raj Thackeray यांनी केला खुलासा

| Updated on: Aug 20, 2021 | 8:39 PM

‘शरद पवार यांची भव्य मुलाखत घेतली तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला होता की, महाराष्ट्राचं एक हुक, म्हणजे ज्यातून सर्वजण एकत्र येतात, असं काय वाटतं तुम्हाला? मला एक साधारण अंदाज होता की ते काय उत्तर देतील. त्या प्रमाणे त्यांनी उत्तर दिलं की छत्रपती शिवाजी महाराज.

Follow us on

YouTube video player

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून राज्यात जातीपातीचं राजकारण वाढलं असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केलाय. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या एका भव्य मुलाखतीमधील एका प्रश्नाचा दाखलाही दिला. ‘शरद पवार यांची भव्य मुलाखत घेतली तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला होता की, महाराष्ट्राचं एक हुक, म्हणजे ज्यातून सर्वजण एकत्र येतात, असं काय वाटतं तुम्हाला? मला एक साधारण अंदाज होता की ते काय उत्तर देतील. त्या प्रमाणे त्यांनी उत्तर दिलं की छत्रपती शिवाजी महाराज. मग मी त्यांना विचारलं की छत्रपती शिवाजी महाराज हे जर आहे, तर तुम्ही तुमच्या भाषणाची सुरुवात किंवा तुमचा पक्ष हा शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाणार. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा का नाही? मूळ विचार जर आपण पाहिला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे’, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.