… तर एकही विमानतळ अदानींनी बांधलं नाही! राज ठाकरेंचा मोठा खुलासा
टाटा-अंबानींच्या तुलनेत, अदानींचे उद्योग स्वयंभू नाहीत. केंद्र सरकारच्या मदतीने त्यांनी दुसऱ्यांचे विमानतळ, बंदरे व सिमेंट व्यवसाय हस्तगत केले आहेत. या अधिग्रहण-आधारित वाढीमुळे मक्तेदारीचा धोका निर्माण झाला आहे. एकच व्यक्ती देशाच्या अर्थव्यवस्थेला वेठीस धरू शकते, ज्यामुळे गंभीर आर्थिक परिणाम होतील, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. हा विकासाचा प्रकार देशासाठी चिंतेचा विषय आहे.
आज विमानतळ ही गोष्ट सोडली तर सात की आठ विमानतळे केंद्राने अदानीला दिले आहे. नवी मुंबईतील विमानतळ सोडलं तर एकही विमानतळ अदानीने बांधलं नाही. ही दुसऱ्यांनी बांधलेली आहेत. केंद्राच्या हातातील आहेत. पोर्ट्समध्ये मुंद्रा पोर्ट्स सोडलं तर जेवढी पोर्ट आहेत ती अदानीने उभी केली नाही, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हंटलं आहे. आज पुण्यात प्रचारानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना राज ठाकरेंनी सांगितलं की, टाटा-अंबानींच्या तुलनेत, अदानींचे उद्योग स्वयंभू नाहीत. केंद्र सरकारच्या मदतीने त्यांनी दुसऱ्यांचे विमानतळ, बंदरे व सिमेंट व्यवसाय हस्तगत केले आहेत. या अधिग्रहण-आधारित वाढीमुळे मक्तेदारीचा धोका निर्माण झाला आहे. एकच व्यक्ती देशाच्या अर्थव्यवस्थेला वेठीस धरू शकते, ज्यामुळे गंभीर आर्थिक परिणाम होतील, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. हा विकासाचा प्रकार देशासाठी चिंतेचा विषय आहे. पोर्ट्समध्ये मुंद्रा पोर्ट्स सोडलं तर जेवढी पोर्ट आहेत ती अदानीने उभी केली नाही. ती दुसऱ्यांची होती. त्यांना गन पॉइंटवर आणून त्यांनी घेतली आहे. सिमेंटच्या व्यवसायात ते कधीही नव्हते. अल्ट्रा टेक आणि अंबुजा सिमेंट विकत घेऊन ते दोन नंबरला गेले आहेत. गेल्या दहा वर्षात दुसऱ्यांचे व्यवसाय खेचून दोन नंबरला गेले. पॉवर आणि स्टिलही तसाच आहे. हा विषय कुणाच्या ग्रोथचा वाढीचा नाही. ती कशी होतेय याचा विषय आहे. उद्या हा एकच माणूस उद्या देशाला वेठीस धरू शकतो. जे इंडिगोने केलं ते होऊ शकतं. इंडिगोने सर्वांना वेठीस धरले. व्यवसाय बंद केल्याने देशाचे हाल झाले. हा धोका सर्वाधिक आहे. तो मुख्यमंत्र्यांनी समजून घेणं गरजेचं आहे, असं म्हणत ठाकरेंनी गंभीर आरोप केले आहेत.
